आदिवासी समाजासाठी विदेशींचे ख्रिस्ती ठेकेदार (एजंट) पैशांचे आमीष दाखवून हिंदु धर्मविरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करतात. हा धर्मांतराचा पहिला टप्पा असतो. त्यानंतर त्यांचे धर्मांतर केले जाते. आदिवासी समाज शहर किंवा गावे यांपासून दूर रहातात. काही जण जंगलात किंवा गावाच्या सीमेवर रहातात. त्यामुळे पुढारलेल्या इतर हिंदु समाजाशी त्यांचा जवळून संपर्क होत नाही. ते गावातील कार्यक्रमात सहभागी असतातच, असे नाही. त्यांच्यावर हिंदु धर्माचे संस्कार करण्यासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. त्यातच भर म्हणून त्यांच्यापैकी काही शिक्षित तरुण अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या जाळ्यात सापडलेले आहेत. त्यामुळे धर्माचे योग्य आचरण तर नाहीच आणि वरून धर्माविषयी चुकीच्या विचारांच्या आहारी यांच्यातील पुढची पिढी गेली आहे. अशांना हेरून ख्रिस्ती त्यांना हिंदूंच्या विरोधात भडकावत आहेत. त्यांना ख्रिस्त्यांकडून पैसे किंवा अन्य साहाय्य केेले जाते. असे करणार्या ख्रिस्ती किंवा इस्लामी संस्थांना विदेशातून सहज निधी उपलब्ध होतो. धर्मांतर करण्याच्या उद्देशानेच ते नोकरी करत असतात.
धर्मांतर करणारे हे ठेकेदार मागास जातीजमातीच्या प्रमुखांना भेटतात. ‘हिंदुद्वेषी शपथ देण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे करावा’, याचे नियोजन करतात. त्यासाठी त्यांनाही मानधन देतात. जमातीचे प्रमुख एक दिवस कार्यक्रम घडवून आणतात आणि त्यात सामूहिकरित्या पुढील प्रकारे शपथ देण्यात येते, ‘मी हिंदु धर्म मानणार नाही; कारण मी हिंदु नाही. मी सरस्वती, लक्ष्मी, गणपति अशा हिंदु देवतांची पूजा करणार नाही. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतारांना मानणार नाही.’ अशा प्रकारची सामूहिक शपथ देण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवून आणले जात आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांना हिंदु धर्माचा तिरस्कार वाटू लागतो. नंतर या लोकांना वस्तू आणि पैसे यांच्या स्वरूपात बरेच साहाय्य केले जाते. त्यांना चर्चमध्ये येण्यास भाग पाडले जाते. काही काळाने ते सहज त्यांचे धर्मांतर करून घेण्यास सिद्ध होतात. त्यानंतर हेच बाटगे (धर्मांतरित) लोक कायमचेच हिंदूंचे शत्रू होऊन रहातात. दुर्दैवाने त्यानंतर तेच स्वतः ठेकेदार म्हणून हिंदूंच्या धर्मांतराचे काम करतात. नंतर हेच हिंदूंचे धर्मांतर करण्याची ख्रिस्त्यांची नोकरी स्वीकारतात. प्रथम हिंदूंमध्ये धर्मद्वेष निर्माण करणे आणि नंतर त्याचे धर्मांतर करणे, हे षड्यंत्र यातून लक्षात येते. हे सर्व टाळण्यासाठी अशा जमातींमध्ये हिंदु धर्माविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास आदिवासी ख्रिस्त्यांच्या हिंदुद्वेषी शपथ कार्यक्रम उद़्ध्वस्त करायला मागे-पुढे पहाणार नाहीत !
– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, फोंडा, गोवा.