समंजस आणि देवाची ओढ असलेला ५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा देशिंग (जिल्‍हा सांगली) येथील कु. शर्विल धर्मे (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. शर्विल गोविंद धर्मे हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्‍ये ‘कु. शर्विल गोविंद धर्मे उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आला असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५१ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५३ टक्‍के झाली आहे. त्‍याच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, त्‍याची साधनेची तळमळ आणि त्‍याच्‍यातील भाव यांमुळे आता त्‍याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(‘शर्विल’ हे भगवान श्रीकृष्‍णाचे नाव आहे.)

श्रावण कृष्‍ण सप्‍तमी (६.९.२०२३) या दिवशी देशिंग (कवठेमहांकाळ, जिल्‍हा सांगली) येथील कु. शर्विल गोविंद धर्मे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आईला जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. शर्विल धर्मे याला ८ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. शर्विल धर्मे

१. उत्तम आकलनक्षमता

‘आम्‍ही शर्विलला बालवाडीत न घालता एकदम पहिल्‍या इयत्तेत घातले; पण गडबडून न जाता तो सर्व लवकर शिकला. त्‍याचे हस्‍ताक्षरही चांगले आहे. त्‍याला शाळेमध्‍ये अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

२. शांत आणि समंजस

शर्विलच्‍या वर्गशिक्षिका त्‍याचे नेहमी कौतुक करतात. त्‍या म्‍हणतात, ‘‘शर्विल शाळेमध्‍ये पुष्‍कळ शांत असतो. तो त्‍याच्‍या वर्गातील मित्रांना बरेच समजून घेतो.’’

श्रीमती अनुजा धर्मे

३. ऐकण्‍याची वृत्ती

तो सांगितलेली सर्व कामे ऐकतो आणि प्रत्‍येक कृती मनापासून करतो. तो घरातील मोठ्यांना कधीही उलट बोलत नाही.

४. स्‍थिर

वर्ष २०२० मध्‍ये त्‍याच्‍या वडिलांचे अपघाती निधन झाले. एवढ्या कठीण प्रसंगातही तो पुष्‍कळ स्‍थिर आहे.

५. देवाची ओढ

तो सायंकाळी ‘शुभं करोती’ आणि इतर श्‍लोक म्‍हणतो. तो शाळेत जातांना नियमितपणे घरातील गणपतीच्‍या मूर्तीला लाल फूल आणि दूर्वा वहातो.

६. जाणवलेला पालट

त्याचा हट्टीपणा न्‍यून झाला आहे.

७. स्‍वभावदोष 

रागीटपणा

– श्रीमती अनुजा गोविंद धर्मे (कु. शर्विलची आई), देशिंग, कवठेमहांकाळ, जिल्‍हा सांगली. (२३.६.२०२३)