कोल्हापूर – शिरोली परिसरात एकाच गल्लीत रहाणारी अल्पवयीन हिंदु युवती (वय १६ वर्षे) आणि मुसलमान युवक (वय १८ वर्षे) यांचे गेल्या २ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. याला दोन्ही कुटुंबियांची संमती नव्हती. अनेक वेळा दोघांना समजही देण्यात आली होती. त्यामुळे प्रेमाला होणारा विरोध पाहून अल्पवयीन हिंदु युवती मुसलमान युवकाच्या घरी गेली. तिथे दोघांनी घरातील लोखंडी पाईपला एकाच नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला. शिरोली परिसरात झालेल्या या घटनेची नोंद शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात झाली आहे. (हिंदु युवतींना धर्मशिक्षण नसल्याने धर्माविषयी अभिमान नाही. त्यामुळे त्या परधर्मियांच्या प्रेमात पडणे आणि पुढे जाऊन आत्महत्या करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. – संपादक)
आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी ‘इंस्टाग्राम’वर स्टोरी ठेवली. त्यात ‘प्रेम करतांना त्याची जात-धर्म बघून प्रेम करू नका; कारण सगळे सारखेच नसतात. ज्याच्यावर प्रेम केले, त्याच्यासमवेत मरायलापण सिद्ध आहे’, असे लिखाण लिहून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात हिंदु समाज ! हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारे उदाहरण ! |