(‘अबाया’ म्हणजे बुरख्यासारखे एक वस्त्र. यात चेहरा वगळून सर्व शरीर झाकले जाते.)
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील सरकारी शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना ‘अबाया’ घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल एटोल यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. गॅब्रिएल एटोल म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या वर्गात प्रवेश करता, तेव्हा विद्यार्थ्यांच्या कपड्यांवरून त्यांची धार्मिक ओळख लक्षात येता कामा नये.’’
सौजन्य हिंदुस्तान टाइम्स
फ्रान्समध्ये वर्ष २००४ मध्ये शाळांमध्ये डोक्यावर स्कार्फ (रूमालासारखे मोठे कापड) आणि वर्ष २०१० मध्ये सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारा बुरखा घालण्यावर बंदी घातली होती.
सौदी अरेबियातही परीक्षा केंद्राच्या ठिकाणी ‘अबाया’वर बंदी
‘अबाया’ हा सौदी अरेबियातील महिलांचा पारंपरिक पोशाख आहे; मात्र गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या शिक्षण विभागाने ‘विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रामध्ये अबाया घालता येणार नाही. शाळा किंवा महाविद्यालय यांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करणार्या विद्यार्थ्यांनाच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल’, असा आदेश दिला होता.
संपादकीय भूमिकाविकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ? |