इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील सर्वोच्च न्यायालयासमोर पाकच्या पश्तून भागातील नेत्यांनी आयोजित केलेल्या निदर्शनात सहस्रो लोक सहभागी झाले होते. ‘पश्तून लोकांचा आवाज ऐकला नाही, तर स्वातंत्र्यासाठी युद्ध होईल’, अशी या नेत्यांनी धमकी दिली आहे. ‘आम्हाला इतर कोणत्याही रूपात इस्लामाबादला येण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानी सैन्याचा केवळ गुंडगिरीवर विश्वास आहे. अशा सैन्याची आम्ही काय अवस्था करतो, ते तुम्ही पहाल. वर्ष १९७१ मध्ये बंगाली लोकांनी सैन्याचे नामोहरण केले होते; मात्र पश्तून लोक सैन्याची चामडी सोलून काढतील’, अशी चेतावणीही दिली.
पश्तूनों ने पाकिस्तान से की आजादी की मांग, सेना को दी खुलेआम धमकी, कहा- ‘बांग्लादेशियों ने सिर्फ पतलून उतारी, हम चमड़ी उतार देंगे’#Pakistan #PashteenProtest #SupremeCourthttps://t.co/9qGxSam2il
— ABP News (@ABPNews) August 20, 2023
‘पश्तून तहफुज मूव्हमेंट’ या संघटनेचे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रांतांमधील उपेक्षित वर्गांना निदर्शनांत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.