एका संतांना ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

१. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता (वस्तूस्थितीशी जुळण्याचे प्रमाण) : ७० टक्के

२. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील सात्त्विक स्पंदने : ८० टक्के’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (३.८.२०२३)

३.  एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण’


३ अ. मारक शक्ती
३ अ १. मारक शक्तीच्या कणांचे वलय ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मध्ये कार्यरत होणे : यात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करणारे लेख प्रकाशित होत असल्याने असे होते.
३ अ २. मारक शक्तीचे कण ‘ई-पेपर’मधून वातावरणात, तसेच तो वाचणार्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे : त्यामुळे व्यक्तीला धर्माचे महत्त्व समजते आणि ती व्यक्ती साधना, तसेच धर्मकार्य करण्यास प्रवृत्त होते.

३ आ. तारक शक्ती

३ आ १. तारक शक्तीच्या कणांचे वलय ‘ई-पेपर’मध्ये कार्यरत होणे : काही साधकांना ईश्वराकडून विविध विषयांवर ज्ञान मिळते, ते ज्ञान ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केले जाते, तसेच अध्यात्माविषयी संतांनी केलेले मार्गदर्शनही त्यात प्रकाशित केले जाते. त्यामुळे असे होते.
३ आ २. तारक शक्तीचे कण ‘ई-पेपर’मधून वातावरणात, तसेच तो वाचणार्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे

३ इ. सगुण चैतन्य

३ इ १. सगुण चैतन्याचे वलय ‘ई-पेपर’मध्ये कार्यरत होणे : याचे कारण ‘ई-पेपर’मध्ये नेहमी सत्य प्रकाशित केले जात असून त्यात साधनेविषयी मार्गदर्शन असते.
३ इ २. सगुण चैतन्याचे वलय ‘ई-पेपर’मधून वातावरणात, तसेच तो वाचणारे साधक किंवा सर्वसामान्य व्यक्ती यांच्याकडे प्रक्षेपित होणे : असे असले, तरी सर्वसामान्य व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जसा असेल, त्यानुसार ती व्यक्ती ‘ई-पेपर’मधील चैतन्य अनुभवू शकते.

३ ई. निर्गुण चैतन्य

३ ई १. निर्गुण चैतन्याचे वलय ‘ई-पेपर’मध्ये कार्यरत होऊन ते वातावरणात, तसेच तो वाचणार्‍या साधकाकडे प्रक्षेपित होणे : त्यामुळे ‘ई-पेपर’ वाचतांना साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवू शकते. तसेच साधकांचे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊ शकते.

३ उ. भाव

३ उ १. भावाचे कण ‘ई-पेपर’मध्ये कार्यरत होणे : साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते. त्यामुळे असे होते.’
– एक संत (२९.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी वििवध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.