(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला विज्ञानाशी जोडू नका !’- अभिनेत्री हेमांगी कवी

सौजन्य:सकाळ

पुणे – ‘मासिक पाळी असतांना देवळात जावेसे वाटते, जा ! नाही वाटत ? नका जाऊ ! पण मग या सगळ्यांत विज्ञानाची माती करू नका ! मासिक पाळीच्या वेळी महिलांना देवळात जाण्यास केली जाणारी बंदी आणि विज्ञान यांचा संबंध जोडणारी ही ‘पोस्ट’ आहे. अभिनेत्री हेमांगी कवी यांनी मैत्रियी बांदेकर या ‘फेसबुक युजर’च्या ‘प्रोफाईल’वरील ‘पोस्ट’ ‘शेअर’ केले असून त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

या ‘पोस्ट’वर एकाने ‘कमेंट’ करत लिहिले आहे की, ‘हिंदु धर्मात स्त्री स्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे. ज्यांना या धर्माविषयी घृणा आहे, त्यांनी खतना (इस्लाममध्ये मुलींची सुंता करण्याची प्रथा) या प्रकाराचा अभ्यास करावा, तसेच स्वतः काळ्या पोत्यात शरीर घालून फिरण्याची नुसती कल्पना करून पहावी. हिंदु धर्मात जन्म घेतला आहे, त्याविषयी देवाचे आभार माना,  नाही तर ७-८ पिल्ले घेऊन अस्वलासारखे फिरायला लागले असते. वरून सासरा आणि दीर यांना खुश ठेवायला लागले असते.’


मासिक पाळीच्‍या वेळी मंदिरात प्रवेश न करण्‍याचे कारण !

मंदिरासारख्‍या पवित्र ठिकाणी अधिक सात्त्विकता असते. एखादे देवस्‍थान जागृत असल्‍यास, त्‍या ठिकाणी त्‍या देवतेची शक्‍ती अधिक प्रमाणात कार्यरत असते. या उलट मासिक धर्माच्‍या काळात महिलांमधील रजोगुण वाढलेला असल्‍यामुळे त्‍यांना मंदिरात गेल्‍यावर त्रास होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे ‘महिलांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने मासिक धर्माच्‍या काळात कोणत्‍या गोष्‍टी टाळायला हव्‍यात ?’ हे हिंदु धर्मात सांगितले आहे. यातून महिलांची काळजीच घेतली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे शस्‍त्रक्रियागृहात त्‍याची शुद्धता जपण्‍यासाठी सर्वांना जाण्‍यास अनुमती नसते, त्‍याचा लाभ सर्व रुग्‍णांना होतो, तसेच सात्त्विक ठिकाणचे पावित्र्य जपले, तर त्‍याचा लाभ सर्व समाजाला होतो.

संपादकीय भूमिका

सर्वच क्षेत्रांत तज्ञांचे म्‍हणणे ग्राह्य धरले जाते. धर्माच्‍या क्षेत्रात मात्र कुणीही उठतो आणि स्‍वतःची मते इतरांवर थोपवण्‍याचा प्रयत्न करतो ! वैदिक कर्मकांड हेच एक विज्ञान आहे. कर्मकांडाचे परिणाम हे स्‍थूलातून सूक्ष्माकडे जाणारे असतात. शाळा, न्‍यायलय, कचेर्‍या, रुग्‍णालये आदी ठिकाणी त्‍या त्‍या ठिकाणचे नियम पाळूनच वागावे लागते. त्‍याचप्रमाणे मंदिर हे सात्त्विक स्‍थळ आहे. तिथे जातांना तेथील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे आहेे. सनातन हिंदु धर्मातील हे प्रगत (वि)ज्ञान समजून न घेता अशी मुक्‍ताफळे उधळणार्‍यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्‍यास अशा गोष्‍टींना आळा बसेल !