हिंदु धर्म संपवण्यासाठी भारतात बाँबस्फोट घडवण्याची पुणे येथील व्यक्तीला मिळाली धमकी !

पुणे – भारतात विविध ठिकाणी बाँबस्फोट घडवून आणण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाँबने उडवून देण्याची धमकी येथील राहुल तायाराम राघुन्हे यांना ईमेलवरून मिळाली आहे. या संदेशामध्ये ‘मी भारतात एक धोकादायक बाँबस्फोट करण्याचे नियोजन करत आहे, मी अनेक आतंकवादी संघटनांना ‘फंडिंग’ (अर्थपुरवठा) करत आहे, मी हिंदु महिला आणि हिंदु धर्माला संपवणार आहे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदीला मारणार आहे’, अशा प्रकारची धमकी दिली आहे. हा संदेश इंग्रजी भाषेमध्ये आहे. याविषयी राघुन्हे यांनी पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका 

  • अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्‍यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !
  • यातून जनतेनेही सतर्क रहाणे आवश्यक आहे, याचा बोध घ्यावा !