‘संपूर्ण जग भ्रमाने भुलून वेडे झाले आहे. रोमरोमांत, कणकणांत व्यापून राहिलेले आत्मचैतन्य सर्वाच्या अंतरी समस्त सामर्थ्य, रस आणि माधुर्य यांसह वास करत आहे; परंतु त्याचा लोकांनी अनुभव केला नाही. लोक मथुरा, काशी आणि द्वारका या यात्रा करत आहेत. ६८ तीर्थांमध्ये स्नान करत आहेत; परंतु सद़्गुरूंविना कोणताही मनुष्य आत्मा-परमात्म्याचा शोध घेऊ शकला नाही, उलट वारंवार भवसागरात गटांगळ्या खात आहे.’
– संत श्री दरियाजी