विश्‍वंभर कुठे प्रगट होतात ?

‘जन्‍मोजन्‍मीच्‍या पुण्‍यांच्‍या प्रतापाने गुरुचरणी माझी प्रीती जुळली आहे. आता ती सुटता सुटणार नाही. तो प्रेमरूपी धागा तुटता तुटणार नाही. कितीही दुःख, संकटे माझ्‍यावर येऊन कोसळली आणि त्‍यांच्‍यामुळे मी विव्‍हळ झालो, तरीही मी गुरुचरण (गुरुदेवांची शरणागती) सोडणार नाही.’ हा माझा निश्‍चय आहे. भलेही हा देह सुटो; पण गुरुचरणी माझा भाव दृढ राहील. माझ्‍यावर शिळा येऊन कोसळल्‍या, तरीही मी गुरुचरण कधीच सोडणार नाही. (संत एकनाथ महाराज म्‍हणतात की, ज्‍याच्‍या हृदयात सद़्‍गुरूंप्रती अशी दृढ निष्‍ठा, माधुर्य आहे, तेथेच विश्‍वंभर प्रगट होतात.’

– संत श्री एकनाथ महाराज