
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील २३ वर्षांच्या तरुणीचा मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तिला शिर्डी येथील ‘हॉटेल सीतारा’ (ओयो हॉटेल) येथे नेऊन आरोपी शेख याने बलात्कार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरून आरोपी हनीफ शेख याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांनी शिर्डीतील काही हॉटेलवर चालू असलेल्या वेश्याव्यवसायावर धडक कारवाई केली होती. हॉटेल मालकांवर गुन्हेही नोंद केले होते, तरीही अशा प्रकारची घटना शिर्डी येथे घडली आहे. (वेश्याव्यवसायांवर धडक कारवाई होऊनही गुन्हे होतात, यावरून गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही, असेच वाटते. यासाठी उत्तरोत्तर कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक) ज्या हॉटेलवर हा प्रकार घडला त्यांनी नियमानुसार ओळखपत्रे घेतली होती का ? कि पैश्याच्या आमिषापोटी त्यांना खोली दिली होती, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !