
टोरंटो (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नुकतीच येथील बी.ए.पी.एस्. श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. त्यांनी कॅनडा दौर्यावर असलेल्या प.पू. महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. बी.ए.पी.एस्.च्या संचालक मंडळाने पंतप्रधान ट्रुडो यांचे स्वागत केले. मंदिराच्या आत ट्रूडो यांनी महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी महंतांनी पुष्पहार घालून ट्रुडो यांचा सत्कार केला. महंत स्वामी महाराजांनी पंतप्रधानांच्या मनगटाभोवती ‘नाडा छडी’ हा पवित्र धागाही बांधला. हा धागा एकता आणि मैत्री यांच्या सामायिक मूल्यांचा प्रतीक मानला जातो.
Trudeau Visits Swaminarayan Temple: बीएपीएस स्वामीनारायण मंदिर पहुंचे कनाडा के पीएम जस्टिन ट्रूडो, स्वामीश्री से धर्म पर की चर्चाhttps://t.co/ySnDswq4uX
— Newsroompost (@NewsroomPostCom) July 16, 2023
मंदिरातील पवित्र वातावरणात पंतप्रधान ट्रुडो यांनी सर्व कॅनेडियन लोकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. ते श्री नीलकंठ वर्णीच्या अभिषेक विधीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी सभामंडपात जाऊन भक्त आणि हितचिंतक यांच्या मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधान ट्रुडो यांनी बी.ए.पी.एस्. मंदिर समुदायाचे आभार मानले.
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांकडून मंदिरांवर, तसेच हिंदूंवर आक्रमण केले जाते. ट्रुडो या खलिस्तानाद्यांचे समर्थन करतात. त्यामुळे ट्रुडो यांनी हिंदूंच्या मंदिराला भेट देणे, हा देखावा आहे ! कॅनडातील हिंदु समुदायाची मते मिळवण्यासाठी अशी कृती करणार्या ट्रुडो यांना तेथील हिंदूंनी खडसावणे आवश्यक ! |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !