हत्येमध्ये साहाय्य केल्याप्रकरणी सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या व्यक्तीला २२ मासांच्या कारावासाची शिक्षा !

सिंगापूर – येथील एका न्यायालयाने ११ जुलै या दिवशी भारतीय वंशाच्या एस्. मगेश्‍वरन् नावाच्या गुन्हेगाराला २२ मासांची शिक्षा सुनावली. ‘मगेश्‍वरन् याने एका व्यक्तीला दिलेल्या भाल्याने तिने अन्य एका व्यक्तीची हत्या केली’, हा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला. मगेश्‍वरन् याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद असून यांमध्ये लोकांना त्रास देणे, भाला बाळगणे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.

याआधी मगेश्‍वरन् याने भाला बाळगल्याच्या प्रकरणी वर्ष २०१९ मध्ये त्याला ३ वर्षे आणि ३ मास एवढ्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वर्ष २०२० मध्ये त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले. जून २०२२ मध्ये त्याने शेरन राज बालासुब्रमण्यम् नावाच्या व्यक्तीला भाला दिला होता. याचा वापर करून बालसुब्रमण्यम् याने अन्य एका व्यक्तीला ठार मारले.