कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार जाऊन तेथे काँग्रेसची सत्ता आली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असल्याचे सांगितले जाते. त्यांतील प्रमुख कारण सामाजिक माध्यमांतून मौलाना (इस्लामी अभ्यासक) शकीरूल्ला रश्दी यांच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे समोर आले आहे. यात मौलाना रश्दी यांनी काँग्रेसचा विजय मुसलमानांमुळे झाल्याचे सांगत त्यासाठी मुसलमान अन् त्यांचे धर्मगुरु यांनी कसे प्रयत्न केले ?, हे नमूद केले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ? हे स्पष्ट होत नसले, तरी त्यातून ‘मुसलमान किती संघटित आहेत ?’, हे लक्षात येईल. हिंदू संघटित न झाल्यास त्यांचे भविष्य किती अंधःकारमय असेल, हेही लक्षात घ्यायला हवे. या व्हिडिओतील मौलानांचे विचार येथे देत आहोत.
उलेमांच्या (इस्लाम धर्माविषयी ज्ञानी लोकांच्या) प्रयत्नांमुळे कर्नाटकचे सत्तांतर ! – मौलाना शकीरूल्ला रश्दी
कर्नाटकचे सत्तांतर एका दिवसात झालेले नाही. त्यामागे अनेक मुसलमान संघटनांचे कष्ट आहेत, अनेक उलेमांचे प्रयत्न आहेत. त्यांनीच मुसलमानांना त्यांच्या मतांची किंमत पटवून दिली. त्यांनी त्यांचे दायित्व चांगल्या प्रकारे पार पडले. अनेक उलेमांनी अल्लाला साकडे घातले आणि ‘आम्ही राज्याची सत्ता पालटू शकतो’, हे दाखवून दिले. असाच आत्मविश्वास कायम ठेवून आपण या देशाचीही सत्ता पालटून दाखवू. त्यासाठी आतापासून प्रयत्न करा. जी मुले १८ वर्षांची झाली आहेत, त्यांची निवडणूक ओळखपत्र सिद्ध करा. आपले काम प्रयत्न करणे, हे आहे, तर परिणाम देणे अल्लाचे काम आहे. कर्नाटकमधील सर्व उलेमा, संघटना, मशिदीचे उत्तरदायी, सर्व बंधू आणि महिला यांनी प्रयत्न केले अन् प्रार्थना केल्या. अल्लाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना परिणाम दिला.