नाशिक – २९ जून या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकावर ‘मुहम्मद सुफिखान रजा फ्रेंड सर्कल गुलशनाबाद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक शहराचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ असा केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सौजन्य: ABP MAJHA
मोगलकाळात नाशिक शहराचे नाव ‘गुलशनाबाद’ होते. त्यानंतर पेशवाईच्या काळात ‘गुलशनाबाद’चे नामकरण ‘नाशिक’ असे करण्यात आले; मात्र त्यानंतर आता अचानक नाशिकचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून या कृतीचा निषेध नोंदवला जात आहे.
‘गुलशनाबाद’चा फलक लावणार्यांवर कारवाई करणार ! – पालकमंत्री दादा भुसेनाशिक – ‘गुलशनाबाद’चा फलक लावणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नाशिक जिल्ह्याचे दादा भुसे यांनी दिले. भुसे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची बैठक ३० जून या दिवशी येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, फलकाविषयीची गोष्ट माझ्याही कानावर आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती आहे. |
संपादकीय भूमिका
|

JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed