राज्यातील ३ लाख ५० सहस्र शाळा आणि महाविद्यालयीन युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० सहस्र शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास विभाग, राज्यातील सर्व विद्यापिठे अन् स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै या कालावधीत ३ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २१ जून या दिवशी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Held a press conference in Mantralay today for the announcement of Rajmata Jijau Self Defense Program.#MediaInteraction #Maharashtra #RajmataJijau #SelfDefense #Mumbai #WomenEmpowerment pic.twitter.com/H0oB9Ie6aE
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) June 21, 2023
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, अलीकडील काळात महिला आणि मुली यांच्यावर होणारे अत्याचार, त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासन अन् समाज यांच्यासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे पुष्कळ आवश्यक आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
युवतींचे मनोबल उंचावण्यासाठी ३ दिवस समुपदेशन सत्र आयोजित करणार !
पहिला दिवस : ‘महिला आणि मुली यांच्यावरील हिंसाचार-संकल्पना अन् सद्य:स्थिती’ या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार्या प्रशिक्षणात १ सहस्र युवती सहभागी होतील. ‘तंत्रज्ञान आणि महिला अन् मुलींना असलेले धोके’ या विषयावर सायबर सेल तज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत होणार्या प्रशिक्षणात १ सहस्र युवती सहभागी होतील.
दुसरा दिवस : स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी ९ ते ९.४५ या वेळेत होणार असून १ सहस्र युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी २० प्रशिक्षक असतील. ‘आधुनिक प्रशिक्षण’ या विषयावर सकाळी १०.०५ ते १०.५० या वेळेत प्रशिक्षण होणार असून १ सहस्र युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी २० प्रशिक्षक असतील.
तिसरा दिवस : प्रात्यक्षिक आणि सराव यांचे सकाळी ९ ते ९.४५ आणि सकाळी १०.०५ ते १०.५० या वेळेत होणार असून या दोन्ही सत्रात १ सहस युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी २० प्रशिक्षक असतील. या ३ दिवसांच्या शिबिरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रूची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागाच्या वतीने करण्यात येईल.
मुंबई विद्यापीठ, एस्.एन्.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार !
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला आणि बालविकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्त्वावर मुंबई विद्यापीठ, एस्. एन्.डी.टी., भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व विद्यापिठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्था यांच्यासमवेत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे सर्व विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्था यांनाही या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका आणि साहाय्यनीस यांनी उस्फूर्तपणे ‘योग दिवस’ साजरा केला, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance