महिलांसाठी असुरक्षित पुणे !

पुणे – येथे २० जून या दिवशी आस्थापनामधून रिक्शाने घरी परतणार्या तरुणीवर रिक्शाचालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काळेपडळ येथील रेल्वे गेटच्या जवळ घडली असून या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्शाचालक अनिकेत कुमार याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी ही रोजच्या प्रमाणे काम संपवून घरी जाण्यासाठी आरोपीच्या रिक्शात बसली होती. त्यानंतर आरोपीने घरी जाण्यासाठी नेहमीच्या रस्त्याने रिक्शा न घेता वेगळ्या मार्गाने नेऊन अंधार्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. (भारतात शिक्षेची कार्यवाही तात्काळ होत नसल्यामुळे बलात्कार्यांना शिक्षेची भिती वाटत नाही. त्यासाठी त्वरित शिक्षेची कार्यवाही होणे, तसेच अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तरच गुन्हेगारांवर वचक बसेल ! – संपादक)
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !
पाणीटंचाईची समस्या मांडतांना विषय भरकटल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री