चेन्नई येथे ‘लव्ह जिहाद’ !
चेन्नई – फहद नावाच्या तरुणाने केरळमधील बनिता नावाच्या २२ वर्षीय तरुणीशी मैत्री करून तिला धर्मांतर करण्यासाठी पळवून नेले. याप्रकरणी बनिताचे वडील वर्गीज अब्राहम यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
Kerala student goes missing from Chennai hostel, father accuses ‘friend’ Fahad of abduction and forced conversionhttps://t.co/GFOHIqAynR
— OpIndia.com (@OpIndia_com) June 17, 2023
यात त्यांनी मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करण्यात आल्याचे म्हटले आहे. बनिता कुवेतमध्ये रहात होती. ती अनिवासी भारतीय आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी ती चेन्नई येथे आली होती, असे वर्गीज यांनी सांगितले.