लव्ह जिहाद्याने हिंदु तरुणींची अश्लील छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !
डेहराडून – येथील जॉली ग्रांट परिसरात जमावाने एका लव्ह जिहाद्याला पकडले आणि त्याला चोप देऊन त्याची धींड काढली. नंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका हिंदु विद्यार्थिनीने एका मुसलमान युवकावर ‘मुसलमानाने माझ्याशी मैत्री करून नंतर माझी अश्लील छायाचित्रे काढली. मी धर्मांतर करावे, यासाठी ही छायाचित्रे दाखवून तो मला धमकावत होता’, असा आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आणि नंतर संबंधित तरुणाची धींड काढण्यात आली. लोकांनी मुसलमानाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचे कपडे फाटले. एका वृत्तानुसार हिंदूंनी आरोप केला आहे की, मुसलमान तरुणाने ३ हिंदु विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले. संबंधित मुसलमान या हिंदु तरुणींना नशेचे पदार्थ खाऊ घालत होता. त्यानंतर त्यांच्याशी संबंध ठेवून त्याची छायाचित्रे काढत होता.
5 महीने, उत्तराखंड में ‘लव जिहाद’ के 50 मामले… लोगों ने मेडिकल छात्रा की अश्लील तस्वीरें लेकर ब्लैकमेल करने वाले का जुलूस निकाला, धुनाई कर पुलिस को सौंपा#Uttarakhand #LoveJihadhttps://t.co/iIBZnm5nYP
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2023
मुसलमान युवकाला चोप देत असल्याची माहिती मिळताच अन्य मुसलमान घटनास्थळी पोचले. ‘जमावाने युवकासह आम्हालाही मारहाण केली’, असा आरोप मुसलमानांनी केला. त्यानंतर दोन्ही गटाचे लोक पोलीस ठाण्यात गेले. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना शांत केले.
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ !
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये लव्ह जिहादची ७६ प्रकरणे समोर आली होती. यावर्षी मे २०२३ पर्यंत लव्ह जिहादची ५० प्रकरणे समोर आली आहेत. यांतील बर्याच प्रकरणांमध्ये हिंदु मुली या अल्पवयीन आहेत.
संपादकीय भूमिकाकेवळ उत्तराखंड नव्हे, तर भारतभरात लव्ह जिहाद रोखण्यास व्यवस्थेला अपयश आले, तर जनताच कायदा हातात घेऊन लव्ह जिहाद्यांना अद्दल घडवेल, हेच अशा घटनांतून दिसून येते ! |

तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !