कर्नाटकात काँग्रेसच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपचा मोर्चा

गोवंशियांच्या हत्येचे केले होते समर्थन

बेंगळुरू – कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धनमंत्री के. व्यंकटेश यांनी ‘म्हशींची सर्रास हत्या केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध केला असून भाजपचे कार्यकर्ते गायी घेऊन रस्त्यावर उतरले.

या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी के. व्यंकटेश यांच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘काँग्रेसने निवडणुकीच्या आधी काही आश्‍वासने दिली होती. त्याची पूर्तता सत्तेत आल्यानंतर केली नाही’, असेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.