आझमगड येथील गावातील हिंदूंच्या धर्मांतराचा कट पोलिसांनी उधळला !  

  • १३ धर्मांध मुसलमानांसह ५ हिंदूंना अटक !

  • सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली करण्यात येणार होते धर्मांतर !

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथील चिरकिहिट गावातील हिंदूंना मुसलमान बनवण्याचा कट पोलिसांनी उधळून लावत १३ धर्मांध मुसलमान आणि ५ हिंदु यांंना अटक केली. यात २ महिलांचाही समावेश आहे. सज्जाद हा या कटाचा मुख्य सूत्रधार असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

येथील अवधेश पासी यांच्या घरामध्ये रात्रभर मुसलमान धर्मगुरूंचे छायाचित्र आणि  त्रिशूळ उभे करून हिंदूंना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. या धर्मांतराला सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप देत येथे कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. या घरामध्ये मजारसारखा (थडग्यासारखा) ढाचा बनवण्यात आला होता. येथे आजार बरे करण्याचा दावा करण्यात येत होता. अवधेश पासी गेल्या ५ वर्षांपासून बाराबंकी येथील देवा शरीफ दर्ग्यात जात होता. तेथे सज्जाद भूत उतरवण्याचे काम करत होता. त्याने अवधेश याचा बुद्धीभेद केला. अवधेशच्या घरामध्ये आलेल्या हिंदूंना मुसलमान होण्यासाठी सांगितले जात होते. त्यांना हिंदु धर्माविरुद्ध भडकावले जात होते. याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन माहिती घेत कारवाई केली.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत आहे. आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याकडे गांभीर्याने पहात हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी कृतीशील होण्याची आवश्यकता आहे !