ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान !
इंदूर (मध्यप्रदेश) – हिंदु राष्ट्राने आपले भले होणार नाही, आपल्याला रामराज्य हवे आहे, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी छींदवाडा येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
सौजन्य न्यूज नेशन
धर्मनिरपेक्ष राष्ट्राविषयीचा असंतोष, हेच हिंदु राष्ट्राच्या मागणीचे कारण !
शंकराचार्य पुढे म्हणाले की, धर्मनिरपेक्ष राष्ट्राविषयी लोकांमध्ये असलेला असंतोष, हेच हिंदु राष्ट्राच्या मागणीचे मुख्य कारण असू शकते; पण हिंदु राष्ट्र झाल्यास इतर धर्मांच्या लोकांमध्ये परकेपणाची भावना निर्माण होईल. अडचण ही आहे की, सध्या ध्रुवीकरणाचे राजकारण चालले आहे. लोकांमध्ये एक रेषा आखली जाते. त्या रेषेच्या आत आपण आहोत कि नाही ?, हे पाहिले जाते. त्यात असणारे वाईट असले, तरी चांगले असतात आणि त्यात नसणारे चांगले असतील, तरी वाईट असतात. आपणच ही वागण्याची पद्धत बनवली आहे. खरे तर राजकारण हा शब्द पार उच्च आहे. तो धर्माइतका मोठा आहे. ‘राजकारण म्हणजे राजाने पाळलेले धोरण’, असा त्याचा अर्थ होतो. रामायण आणि महाभारत यांमध्ये राजकारण शब्दाचा वापर झाला होता. आजकाल ते राजकारण राहिलेले नाही.
संपादकीय भूमिकाहिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे ! |