|

रांची (झारखंड) – झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीमध्ये मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी जागा देण्याच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर सरकारकडून सांगण्यात आले आहे की, या प्रकरणासाठी ७ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. इतर राज्यातील विधानसभांमध्ये कशी परिस्थिती आहे ?, याचा अभ्यास करून समिती ३१ जुलैला आम्हाला अहवाल सादर करणार आहे.
१. विशेष म्हणजे सरकारचा हा प्रस्ताव सप्टेंबर २०२१ मध्ये आला होता. त्या वेळी याला विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून विरोध करण्यात आल्यानंतर सरकारने समिती स्थापन केली होती. ४५ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार होती; मात्र गेल्या २ वर्षांत पहिल्या समितीचा अहवाल काय होता ? किंवा त्या वेळी काय झाले ? तो अहवाल सादर झाला कि नाही ?, हे अद्याप कुणालाही समजू शकलेले नाही. विधानसभेत ४ मुसलमान आमदार आहेत; मात्र त्यांपैकी कुणीही वेगळी नमाजपठणासाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी केलेली नाही.
२. याचिकाकर्ते अजयकुमार मोदी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एखाद्या आवारात अशा प्रकारे एखाद्या धर्माच्या प्रार्थनेला संमती देणे, हे इतर धर्मियांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे. ‘सर्व धर्म समान’ या तत्त्वाचेदेखील यामुळे हनन होत आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंना नामजप, ध्यान आदी धार्मिक कृती करण्यासाठी सरकारी वास्तूंमध्ये स्वतंत्र जागा देण्याचा विचार कोणताच राजकीय पक्ष कधी का करत नाही ? |
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena