डोंबिवली – ठाकुर्ली येथील १५ गुंतवणूकदरांचे ३१ लाख ५३ सहस्र रुपये घेऊन ५ वर्षांपूर्वी पसार झालेल्या सोहनसिंह चैनसिंह दसाना या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकाला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. १५ जणांकडून दागिने घेऊन कर्ज देण्याचे आश्वासन दिले, तसेच सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर तो राजस्थान येथे पळून गेला होता. मिनू गांधी यांच्यासह १५ ग्राहकांनी तक्रार केल्यावर पोलीस गेल्या ५ वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. गटबोर तालुक्यातील थुरावड गावातून त्याला पकडण्यात आले.