भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

महायोगी अरविंद घोष अर्थात महर्षि अरविंद

योगी अरविंद यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (१५ ऑगस्ट) इंग्लिश सैन्याने जर्मनांची ७०० विमाने पाडली आणि युद्धाचे पारडे संपूर्णपणे मित्र राष्ट्रांच्या विजयाकडे झुकले. भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.

योगी अरविंद यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे, ‘‘आमचा उद्देश हा सरकारी व्यवस्था अथवा पद्धती पालटण्याचा नाही, तर आम्हाला देश उभारणी करायची आहे. यामध्ये ‘राजकारण’ हा केवळ त्याचा भाग असेल. आपण शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती अधिकाधिक मिळवण्यासाठी आधी झटायला हवे, ते भारतीय विचार, आचार, दृष्टीकोन आणि ऊर्जा यांना पुन्हा मिळवण्यासाठी ! भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ आहे.’’ यांसारखी अगणित तत्त्वरत्ने श्री अरविंद यांच्या ग्रंथात आहेत.

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)