देशातील जनता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अक्षम्य अपराधांना क्षमा करील का ?

देशविरोधी कारवाया आणि वक्तव्ये करणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता जनतेनेच कायमचे घरी बसवायला हवे !

१. राहुल गांधी यांच्याकडून ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाहीच्या चारही स्तंभांचा अपमान

ब्रिटनच्या दौर्‍यावर असतांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्‍वविद्यालयात भारतविरोधी वक्तव्यांची मालिकाच चालू केली. ते एवढ्यावरच न थांबता त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत किंवा कार्यक्रमात भारत आणि भारतातील घटनात्मक संस्था यांच्या विरोधात आक्रमण करत राहिले. भारतातील न्यायसंस्थेचा अपमान करून त्यांनी न्यायसंस्थेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. या वेळी ते चीनचे गुणगान करत चीनविषयी प्रेम व्यक्त करतांना दिसून आले. यापूर्वीही त्यांनी चीनविषयी त्यांचे प्रेम दाखवले होते. भारत आणि चीन या देशांमध्ये गलवान येथे संघर्ष झाला होता, तेव्हाही त्यांनी भारतीय सैन्याविषयीच प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यांनी भारत एक राष्ट्र नाही, तर राज्यांचा संघ आहे, असे म्हटले, तसेच राज्यांना वाटाघाटी करण्याचा अधिकार असण्याविषयीच्या गोष्टी केल्या. या गोष्टी भारतीय राज्यघटनेच्या रचनेच्या पूर्ण विरोधी आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी भारतातील लोकशाही मेलेली आहे, असे घोषित केले. आपले म्हणणे पुढे रेटून त्यांनी म्हटले, भारताला लोकशाही देण्यास अमेरिका किंवा युरोप यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी ब्रिटनमध्ये भारतीय संसदेचा अवमान करत भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य संपले असल्याचे धादांत खोटे विधान केले. प्रसारमाध्यमांसह न्यायव्यवस्था, जनादेश आणि संसद या सर्वांचा त्यांनी अपमान केला.

२. राहुल गांधींचा भारतविरोधी कृतघ्नपणा

एकंदरीत राहुल गांधी यांचा ब्रिटन दौरा हा भारताच्या संपन्नतेला विरोध करण्यासाठी सुनियोजित कार्यक्रम बनला. राहुल गांधी ज्या देशातील न्यायव्यवस्थेवर टीका करत आहेत, त्याच देशाच्या न्यायव्यवस्थेने त्यांना नॅशनल हेराल्डच्या आर्थिक घोटाळा प्रकरणातील खटल्यामध्ये जामिनावर सोडले आहे. भारताच्या ज्या संसदेचा ते विदेशात अवमान करत आहेत, त्याच संसदेत ते कित्येक घंटे सूत्रांविना नाटके करत असतात, कधी डोळा मारतात, तर कधी सभापतींच्या दालनामध्ये जाऊन विदूषकाप्रमाणे वर्तन करतात. भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य संपले आहे, असे सांगतांना त्यांनी लक्षात ठेवावे की, देश-विदेशात भारताच्या विरोधात टीका किंवा वक्तव्ये करणार्‍यांवर भारत देश कोणतीही कारवाई करत नाही. हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला निवडणुकीत प्रचंड जनमत देऊन सत्तेवर बसवले आहे, याचे राहुल गांधी यांना विस्मरण झाले आहे. या देशातील तेच लोक आहेत, ज्यांनी राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाचा आणि केरळमधील वायनाडमध्ये विजयाचा अनुभव दिला. भारताच्या लोकशाहीला मृत ठरवतांना त्यांच्या आत्म्याला काहीच वाटले नाही. ते ज्या लोकशाहीला मृत घोषित करत आहेत, त्या देशाने त्यांना एवढी मोठी ओळख दिली की, राहुल गांधी विदेशात भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करतांना हसत आहेत. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७५ मध्ये लोकशाहीची हत्या करून देशाला आणीबाणीच्या साखळदंडामध्ये बांधले होते, याची राहुल गांधी यांना आठवण नाही का? याच आणीबाणीतील अमानुष अत्याचारांमुळे लोकशाहीची हत्या झाली होती, याची त्यांना कुणी आठवण करून देईल का ?

३. राहुल गांधी यांचे परकीय राष्ट्रांना भारतीय लोकशाही हटवण्याचे आवाहन

राहुल गांधी ज्या अमेरिका किंवा युरोप देशांना भारतातील लोकशाही हटवण्याविषयी सांगत आहेत, त्या देशांमध्ये खरोखरच लोकशाही आहे का ? ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर कॅपिटल हिलचे विचार, ब्रिटनमधील अस्थिर सरकारे आणि तेथे अकाली पालटणारे पंतप्रधान ही कोणत्या लोकशाहीची उदाहरणे आहेत. ? राहुल यांच्या होत असलेल्या पराभवामुळे ते देशाच्या विरोधात सूड उगवत आहेत आणि त्यामुळेच ते असे वागत आहेत.

खोटारड्या गांधी घराण्यातील राजकुमाराला भारताची लोकशाही आणि जनमत यांचा विदेशात अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला ?, असे देशातील जनतेने विचारले पाहिजे. निवडणुकीत भारतीय जनतेने काँग्रेस आणि खोटारडे गांधी कुटुंब यांना रद्दीच्या कुंडीत फेकून दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस रसातळाला जात आहे, तरीही ती भारताच्या विरोधातील देशद्रोही विचारांपासून बाजूला झालेली नाही. भारताच्या सैन्याविषयी प्रश्‍न उपस्थित करणारे, सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी भारतीय सैन्याकडून पुरावे मागणारे,  भारतीय सैन्याचा अपमान करणारे, संसदेत चर्चा करण्याऐवजी डोळा मारणारे राहुल गांधी त्यांच्या टूलकिट (एखादी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी राबवण्यात आलेली योजना) टोळीच्या इशार्‍यावर वागत असतात.

४. राहुल गांधींकडून विदेशातील भारतविरोधी शक्तींना बळ देण्याचा प्रयत्न

भारताच्या विरोधातील चळवळीची सुपारी घेणारे राहुल गांधी हे ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे दलाल आहेत का ? राहुल गांधी, भारताची मानहानी करणारे आणि भारताविरुद्ध षड्यंत्र रचणारे असे सर्व विदेशी लोक आपसात मिळालेले आहेत का ? ते भारतविरोधी टूलकिटच्या हिशोबाने प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचा विरोध आणि भारताचा विरोध यांमधील अंतर ठाऊक नाही का ? अशा परिस्थितीत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान कसे होणार ? काँग्रेसच्या राजपुत्राची हीच मोहीम आहे का ? भारताच्या विरोधात जॉर्ज सोरोस यांची भाषा बोलणारे राहुल गांधी भारताच्या विरोधात विदेशी शक्तींना एकत्रित करण्याचे काम करत आहेत का ? हा निव्वळ राष्ट्र्रद्रोह नाही का ?

असे विक्षिप्त आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी नेमलेले राहुल गांधी चुकून जरी देशाचे पंतप्रधान झाले, तर काय होईल ? याचा जरा विचार करा. त्यांना मिळालेल्या पदव्यांवर खरे नाव रॉल विंची असेच आहे. त्यामुळे यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचे आरोप वेळोवेळी होत आले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. राहुल गांधी यांची नार्को चाचणी व्हायला हवी, असे आपल्याला वाटत नाही का ? त्यामुळे यांनी देशातील लोकशाही संपवण्यासाठी भारताच्या विरोधात कोणते टूलकिट सिद्ध केले आहे, ते लोकांना कळेल.

५. राहुल गांधी आणि पाकिस्तानी कमाल मुनीर यांचे सख्य

मूळ पाकिस्तानी असलेले कमाल मुनीर आणि राहुल गांधी यांच्यामधील संबंधाविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी यांचा केंब्रिजमधील संपूर्ण कार्यक्रम डॉ. कमाल मुनीर यांनी आयोजित केला होता. डॉ. कमाल मुनीर हे मूळचे पाकिस्तानमधील असून ते केंब्रिज विद्यापिठामध्ये साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी राहुल गांधी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, तसेच संपूर्ण कार्यक्रमही आयोजित केला होता. डॉ. कमाल मुनीर हे काश्मीरचा समावेश पाकिस्तानमध्ये करावा, या मताचे आहेत. त्यांनी भारताच्या विरोधात कित्येक प्रक्षोभक ट्वीट केले आहेत. कमाल मुनीर भारतियांवर संकटकारी आक्रमण करणारी वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कमाल मुनीर यांना पाकिस्तान सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशा देऊन सन्मानित केले आहे. ते मूळ लाहोर येथील रहिवासी आहेत. राहुल गांधी आणि कमाल मुनीर यांच्या संबंधांमधून भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या विरोधात ते देशद्रोह करत आहेत, हे सहजपणे समजू शकते.

६. भारताचा विदेशात अपमान केल्याविषयी जनतेने राहुल गांधी यांना जाब विचारणे आवश्यक !

जॉर्ज सोरोस यांचे भारतातील लोकशाही सरकार पाडण्याविषयी षड्यंत्र करणारे वक्तव्य आणि त्यानंतर राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापिठातील भारतविरोधी भाषण, पत्रकार परिषदेत भारताच्या विरोधातील वक्तव्ये, जॉर्ज सोरोस, कमाल मुनीर अन् टूलकिटच्या बाहुलीप्रमाणे राहुल यांची वागणूक यावरून सर्वकाही स्पष्ट होत आहे.

निवडणुकीची सभा असल्याप्रमाणे त्यांनी केंब्रिजमध्ये भारताच्या विरोधात विधाने करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान केला. भारताचा विरोध करणे, हा राहुल गांधी यांचा हेतू आहे का ? राहुल गांधी आंतरराष्ट्रीय टोळीच्या सूचनांवर नाचत आहेत आणि सुनियोजितपणे भारताच्या विरोधात विधाने करून देशाची जनता, राज्यघटना, भारतीय  लोकशाही आणि जनादेश यांचा विदेशामध्ये अपमान करत आहेत. देशातील जनता राहुल गांधी यांच्या अक्षम्य अपराधांना क्षमा करील का ?

लेखक : कृष्णमुरारी त्रिपाठी अटल

(साभार : साप्ताहिक विवेक, हिंदी; मार्च २०२३)