अमेरिकेचा प्रभाव अल्प होत असल्याने मॅक्रॉन चीनचे लागूंलचालन करत आहेत ! – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर टीका

डावीकडून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वाशिंग्टन  (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकेचे राष्ट्राध्यपद सोडल्यानंतर जगभरात अमेरिकेचा प्रभाव अल्प होत आहे. अमेरिका काहीच करत नाही. माझे मित्र मॅक्राँन चीनमध्ये गेले. तेथे त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे लांगूलचालन केले. फ्रान्स आता चीनशी संबंध प्रस्थापित करत आहे.

१. मॅक्रॉन मागील आठवड्यात चीनच्या दौर्‍यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, युरोपीय लोकांनी स्वतःला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या साखळीमध्ये बांधून घेऊ नये. तैवानच्या सूत्रावरून युरोपीय देशांनी चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामध्ये अडकू नये. ही आपली लढाई नाही. आपण यात फसू नये.

२. चीन तैवानवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर अमेरिकेने तैवानला साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मॅक्रॉन यांनी शी जिनपिंग यांच्याशी तैवान प्रकरणी चर्चा करून त्यानंतर त्यांनी वरील विधान केले.