कोलकाता (बंगाल) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात दोन मुली सिगारेट हातात घेऊन राष्ट्रगीत म्हणत त्याचा अवमान करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या मुलींवर गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. ‘दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत’, असे पोलिसांनी सांगितले. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यावर टीका होऊ लागल्याने या मुलींनी तो पुसून (डिलीट) टाकला आहे. राष्ट्रगीताचा अवमान करणार्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
हाल ही में सिगरेट पीते हुए राष्ट्रगान का मजाक उड़ाने वाली लड़कियों का वीडियो वायरल हुआ था. जिस पर पुलिस ने कार्रवाई करते हुए मामला दर्ज कर लिया है-#ViralVideo #KolkataPolice #Kolkata #India https://t.co/l7kZtfkriu
— ABP News (@ABPNews) April 12, 2023
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! |