पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे – पिंपरी-चिंचवड परिसराचा पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात केवळ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. ‘एल् निनो’ प्रवाहाच्या प्रभावामुळे वर्ष २०२३-२४ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जून २०२४ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा आराखडा सिद्ध करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. सध्या शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. आन्द्रा-भामा आसखेड धारण हे प्रकल्प गतीमान करण्याची योजना आहे. त्यातून पाणी उपसा केल्यास काही प्रमाणात साहाय्य होऊ शकते. यासमवेतच खासगी कूपनलिका, विहिरी यांचे सर्वेक्षण, दुरुस्ती अधिग्रहण करणे, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक करणे, पाणी गळती रोखण्याच्या उपाययोजना यांवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला महापालिका अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले आणि अधिकारी उपस्थित होते.