|
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर येथे ३० मार्च या दिवशी श्रीरामनवमीनिमित्त मंगलादेवी मित्र मंडळाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा झाल्यावर रात्री ९.३० वाजता हिंदु तरुण घोषणा देत परत घरी जात असतांना कसाली मोहल्ला मुसलमानबहुल वस्तीतील धर्मांधांनी हिंदु तरुणांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये ३ हिंदु तरुण घायाळ झाले आहेत. या वेळी हिंदु तरुणांनीही धर्मांधांवर दगडफेक करून त्यांना प्रत्युत्तर दिले. या प्रकरणी रात्री विलंबापर्यंत दोन्ही गटांतील तरुणांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्याचे काम चालू होते. अमळनेर येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हिंदु तरुण शांततेत घोषणा देत घरी जात असतांना धर्मांध जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करतात. हे मुद्दामहून कुरापत काढण्यासारखे नव्हे का ? कुणी याला ‘धर्मांधांचे हे पूर्वनियोजित कारस्थान आहे’, असे म्हटल्यास त्यात चूक काय ? यापुढे हिंदूंनी पोलिसांवर विसंबून न रहाता स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे. – संपादक)
१. या घटनेची माहिती गावातील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना समजल्यानंतर हिंदूंनी संघटित होऊन धर्मांधांवर दगडफेक करण्यास प्रारंभ केला.
२. त्यानंतर अमळनेर शहरातील मण्यार मोहल्ला, दारू मोहल्ला आणि भोईवाडा येथूनही धर्मांधांनी हिंदु तरुणांवर दगडफेक केली. या वेळी या चारही भागांतील धर्मांधांवर दगडफेक करून हिंदूंनी प्रत्युत्तर दिले. या वेळी दोन्हीकडून घोषणा देणे चालू होते.
३. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी आले.
४. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसर शांत केला. सध्या अमळनेर येथे तणावपूर्ण शांतता आहे.
संपादकीय भूमिका
|