नवी देहली – राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार महंमद फैजल यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांनी या विषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयातील सुनावणीच्या काही वेळ आधीच त्यांच्या खासदारकीचे निलंबन मागे घेण्यात आले.
महंमद फैजल यांना १३ जानेवारी २०२३ या दिवशी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यासह इतर तिघांना एका हत्या प्रकरणात केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती; मात्र त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी त्यांची शिक्षा रहित केली होती.