राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणी ३ वेळा मागितली आहे क्षमा !

राहुल गांधी

नवी देहली – ‘मोदी’ आडनावाची मानहानी केल्यावरून राहुल गांधी यांनी क्षमा न मागितल्याने त्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. याविषयी ते म्हणाले आहेत, ‘क्षमा मागायला मी सावरकार नाही. मी गांधी आहे’;

मात्र प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये ‘चौकीदार चोर है’ या विधानावरून न्यायालयाकडे ३ वेळा विनाअट क्षमा मागितलेली आहे. त्यामुळे ते शिक्षा होण्यापासून सुटले होते.