गुजरातमधील एका महिला डॉक्टरने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला !

अमेरिकास्थित एका अनिवासी भारतीय महिला डॉक्टरने इस्लाम सोडून स्वीकारला, सनातन धर्म ! (चित्रावर क्लिक करा)

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – अमेरिकास्थित एका अनिवासी भारतीय महिला डॉक्टरने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. या महिलेने उत्तरप्रदेशमधील डासना येथील शिवशक्ती धाम मंदिरात सुमारे १२ लाख रुपये किमतीचा १९ तोळ्यांचा सोन्याचा मुकुट भगवान शिवाला अर्पण केला. यासोबतच त्यांनी मंदिराला लाखो रुपये आणि इतर सजावटीचे साहित्यही अर्पण केले.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार या महिला डॉक्टरने भगवान महादेवाला गुरु आणि महाकालीदेवीला माता म्हणून स्वीकारले आहे. शिवशक्ती धाम दासना मंदिराचे महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले की, या महिलेने इस्लाम सोडल्यानंतर सनातन धर्म स्वीकारला आणि येथे रुद्राभिषेक करून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला.