आम्ही कुठल्याही देशावर बाँबद्वारे आक्रमण करू ! – रशियाची धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – आम्ही कुठल्याही देशावर बाँबद्वारे आक्रमण करू, अशी धमकी रशियाने दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अटक करण्यासाठी वॉरंट काढल्याच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने प्रत्यत्तरादाखल ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

युक्रेन युद्धातील युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुतिन यांच्या विरोधात हे अटक वॉरंट काढले आहे.