अण्वस्त्र आक्रमणाची सिद्धता करा ! – किम जोंग यांचा सैन्याला आदेश

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग (उजवीकडे)

सेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरिया एकत्र युद्ध सराव करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी त्यांच्या सैन्याला अण्वस्त्रांच्या आक्रमणाची सिद्धता करण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या युद्ध सरावाला उत्तर म्हणून उत्तर कोरियानेही सैनिकी सराव केला. या वेळी बनावट आण्विक शस्त्र वाहून देणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागण्यात आले. गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाने एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.

८ लाख लोकांना सैन्यात भरती व्हायचे आहे ! – उत्तर कोरिया

अमेरिकेच्या विरोधात युद्धासाठी उत्तर कोरियातील ८ लाख लोकांना सैन्यात भरती व्हायचे आहे. यामध्ये विद्यार्थी आणि नोकरदार यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हा दावा उत्तर कोरियाच्या ‘रॉडोंग सिनमुन’ या वृत्तपत्रात करण्यात आला आहे.