
देवद (पनवेल), १७ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, तसेच सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सर्व प्रकारच्या त्रासांचे निवारण व्हावे, यांसाठी सनातनच्या येथील आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ १६ मार्च या दिवशी सनातनच्या पुरोहितांच्या हस्ते पार पडले. सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते.
‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता. पूर्व दिशेची इंद्र, आग्नेय दिशेची अग्नि, दक्षिण दिशेची यम, नैऋत्य दिशेची निऋति, पश्चिम दिशेची वरुणदेवता, वायव्य दिशेची वायुदेव, उत्तर दिशेची कुबेर, ईशान्य दिशेची ईशान, उध्र्व(वर) दिशेची ब्रह्मदेव आणि अधः(खालच्या) दिशेची देवता अनंत या देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती, क्षेत्रपालपूजन आदी झाले. प्रार्थना आणि कृतज्ञता यांनी पूजनाची सांगता झाली.
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधनेच्या संदर्भात इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते मी करतो’, या प्रयत्नांचे आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी असलेले साम्य !