सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ब्रह्मा, विष्‍णु आणि शिव या तिन्‍ही रूपांत अनुभवलेले दैवी कार्य !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१५.२.२०२३ या दिवशी भावार्चना करतांना गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) शिवरूपात पाहून मी त्‍यांच्‍या चरणी बेल अर्पण करत होतो. त्‍यानंतर त्‍यांच्‍या चरणी मानस साष्‍टांग नमस्‍कार करतांना माझ्‍या मनात त्‍यांच्‍या दैवी कार्याविषयी विचार आले. त्‍यासंदर्भात गुरुदेवांनी सुचवलेले हे विचार त्‍यांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

श्री. संगम बोरकर

१. ‘सनातन संस्‍थेची स्‍थापना’ हे गुरुदेवांचे निर्मिती करणारे ब्रह्मारूप, अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासांपासून साधकांचे रक्षण करणारे ते विष्‍णुरूप आणि सृष्‍टीतील सर्व दुष्‍प्रप्रवृत्तींचा लय करणारे ते शिवरूप असणे

१ अ. ब्रह्मारूप : ‘सनातन संस्‍थेची स्‍थापना’, हे गुरुदेवांचे निर्मिती करणारे ब्रह्मारूप होते.

१ आ. विष्‍णुरूप : ‘मागील २५ वर्षांपासून गुरुदेव साधकांचे पालन करत आहेत आणि त्‍यांचे अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासांपासून रक्षण करत आहेत’, हे त्‍यांचे पालन करणारे विष्‍णुरूप आहे.

१ इ. शिवरूप : वर्ष २०२३ च्‍या महाशिवरात्रीपासून गुरुदेवांचे लयकारी शिवतत्त्व कार्यरत होणार आहे. त्‍यामुळे  सृष्‍टीतील सर्व दुष्‍प्रप्रवृत्तींचा लय (विनाश) होऊन पृथ्‍वी पुन्‍हा शुद्ध होणार आहे. या विनाशकाळात गुरुदेवांचे वात्‍सल्‍यरूप आणि पालनकर्ता विष्‍णुरूप साधकांचे रक्षण करणार आहे. या लय काळानंतर पुन्‍हा सत्‍ययुगाला आरंभ होणार आहे.

‘हे गुरुदेवा, आम्‍हा सर्व साधकांना तुमच्‍या या रूपांशी एकरूप होता येऊन तुमची कृपा अनुभवता येऊ दे’, हीच आपल्‍या पावन चरणी प्रार्थना आहे. सर्व साधकांचा योगक्षेम वहाणार्‍या हे गुरुदेवा, आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कृतज्ञतापूर्वक अर्पण, श्री. संगम बोरकर, फोंडा, गोवा. (१५.२.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक