यजमान रुग्‍णाईत असतांना सनातनच्‍या ७० व्‍या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (वय ५७ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् हे विमानतळाच्‍या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्‍यामुळे त्‍यांना गंभीर दुखापत होऊन नंतर ते विमानात बेशुद्ध पडले. या गंभीर स्‍थितीतूत ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अपार कृपेमुळेच वाचले. या संदर्भातील अनुभूतींचा काही भाग आपण १५.३.२०२३ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

लेखाचा भाग १  पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/662672.html

(भाग २)

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्
श्री. रविचंद्रन्

८. श्री. रविचंद्रन् यांच्‍या खांद्यावर केलेले उपचार !

८ अ. अस्‍थीरोग तज्ञांनी ‘नैसर्गिकरित्‍या खांदा बरा होतो का ?’, हे पहाण्‍यासाठी १० दिवस वाट पाहू’, असेसांगणे : ‘आम्‍ही माझे यजमान श्री. रविचंद्रन् मोसूर राजगोपाल (वय ६२ वर्षे) यांना घेऊन मुंबईहून चेन्‍नईला आलो. चेन्‍नईला पोचल्‍यावर लगेचच आम्‍ही यजमानांंना झालेल्‍या खांद्याच्‍या दुखापतीसाठी अस्‍थीरोग तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. सद्यःस्‍थितीत यजमानांची प्रकृती मोठ्या शस्‍त्रकर्मासाठी योग्‍य नसल्‍याने अस्‍थीरोग तज्ञ म्‍हणाले, ‘‘नैसर्गिकरित्‍या खांद्याची दुखापत बरी होते का ?’, ते पहाण्‍यासाठी १० दिवस थांबूया.’’

८ आ. खांदा नैसर्गिकरित्‍या बरा होण्‍याची शक्‍यता नसल्‍यामुळे ‘शस्‍त्रकर्म करणे हाच पर्याय आहे’, असे अस्‍थीरोग तज्ञांनी सांगणे आणि ‘शस्‍त्रकर्म करणे जोखमीचे आहे’, याची त्‍यांनी जाणीव करून देणे : १० दिवसांनी यजमानांच्‍या खांद्याचा नवीन ‘एक्‍स रे’ काढून पाहिल्‍यावर अस्‍थीरोग तज्ञ म्‍हणाले, ‘‘खांद्याच्‍या ठिकाणी असलेला ‘बॉल’ भंग पावला असून तो खांद्यातून निखळला आहे. त्‍यामुळे खांदा नैसर्गिकरित्‍या बरा होण्‍याची शक्‍यता नसून ‘शस्‍त्रकर्म करणे’, हाच एक पर्याय आहे. तुटलेले हाड जोडण्‍यासाठी एक साधे शस्‍त्रकर्म करावे लागेल. हे शस्‍त्रकर्म करतांना आवश्‍यकता भासल्‍यास खांदा प्रतिस्‍थापित करण्‍याचे (खांद्याचे नवीन हाड बसवण्‍यासाठी) मोठे शस्‍त्रकर्म करावे लागेल.’’ यजमानांना मूत्रपिंडाची समस्‍या असल्‍यामुळे हे शस्‍त्रकर्म करणे पुष्‍कळ जोखमीचे होते. अस्‍थीरोग तज्ञांनी आम्‍हाला शस्‍त्रकर्माच्‍या वेळी होणार्‍या संभाव्‍य गंभीर परिणामांविषयीही सांगितले, उदा. अधिक रक्‍तस्राव होऊन रक्‍त द्यावे लागणे (ब्‍लड ट्रान्‍सफ्‍यूजन) किंवा ‘डायलिसिस’ (टीप), अशा आवश्‍यकता भासू शकतात.

टीप – मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्‍यून झाल्‍याने रक्‍तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्‍याची प्रक्रिया

८ इ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शस्‍त्रकर्माच्‍या आधी एक नामजप करण्‍यास सांगणे : मी त्‍वरित भ्रमणभाष करून सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना अस्‍थीरोग तज्ञांनी सांगितलेल्‍या सर्व गोष्‍टी सांगितल्‍या. सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी मला एक नामजप शस्‍त्रकर्माच्‍या ४ दिवस आधी प्रतिदिन करण्‍यास सांगितला, तसेच शस्‍त्रकर्माच्‍या दिवशी त्‍यांना भ्रमणभाष करण्‍यास सांगितले.

८ ई. श्री. रविचंद्रन् यांच्‍या रक्‍तातील ‘पोटॅशिअम’ची पातळी वाढल्‍यामुळे त्‍यांचे शस्‍त्रकर्म करण्‍यात अडथळा येणे; परंतु शस्‍त्रकर्माच्‍या दिवशी ‘पोटॅशिअम’ची पातळी सामान्‍य होणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शस्‍त्रकर्माच्‍या वेळी गुरुस्‍मरण करण्‍यास सांगणे : २२.११.२०२२ या दिवशी यजमानांचे शस्‍त्रकर्म करण्‍यात एक अडथळा निर्माण झाला. त्‍यांच्‍या रक्‍तातील ‘पोटॅशिअम’ची पातळी पुष्‍कळ वाढून ती ५.८ मिलीमोल्‍स प्रतीलिटर झाली. (‘निरोगी व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तातील पोटॅशिअमची सर्वसाधारण पातळी ३.६ ते ५.२ मिलीमोल्‍स प्रतीलिटर एवढी असते.’- संकलक) ‘पोटॅशिअम’ची पातळी न्‍यून होण्‍यासाठी अस्‍थीरोग तज्ञांनी त्‍यांना ४ दिवसांची औषधे दिली. ते म्‍हणाले, ‘‘पोटॅशिअम’ची पातळी ५.२ मिलीमोल्‍स प्रतीलिटर इतकी न झाल्‍यास शस्‍त्रकर्म करता येणार नाही.’’ शस्‍त्रकर्माच्‍या दिवशी यजमानांच्‍या रक्‍ताची चाचणी केल्‍यावर त्‍यांच्‍या रक्‍तातील ‘पोटॅशिअम’ची पातळी ३.२ मिलीमोल्‍स प्रतीलिटर, म्‍हणजे सामान्‍य झाली होती. शस्‍त्रकर्माच्‍या दिवशी मी सद़्‍गुरु मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष केला. त्‍यांना यजमानांच्‍या रक्‍तातील ‘पोटॅशिअम’च्‍या पातळीविषयी काही ठाऊक नसूनही ते म्‍हणाले, ‘‘आता शस्‍त्रकर्म करण्‍यासाठी कुठलाही अडथळा दिसत नाही.’’ त्‍यांनी शस्‍त्रकर्माच्‍या वेळी केवळ गुरुस्‍मरण (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्‍मरण) करण्‍यास सांगितले.

९. श्री. रविचंद्रन् यांच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी केलेला भावजागृतीचा प्रयोग !

९ अ. प.पू. गुरुदेवांचे विराट रूप दिसणे, ‘त्‍यांच्‍या चरणांच्‍या समोरच श्री. रविचंद्रन् यांचे शस्‍त्रकर्म चालू आहे’, असे जाणवणे आणि शस्‍त्रकर्म करणार्‍या अस्‍थीरोग तज्ञांच्‍या ठिकाणी सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ दिसणे : शस्‍त्रकर्माच्‍या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत मी भावजागृतीचा एक प्रयोग केला. तेव्‍हा मला प.पू. गुरुदेवांचे विराट रूप दिसले. विशेषतः मला त्‍यांच्‍या चरणकमलांचे विराट रूपात दर्शन झाले. ‘त्‍यांच्‍या चरणांच्‍या समोरच माझ्‍या यजमानांचे शस्‍त्रकर्म चालू आहे’, असे मला दिसले. त्‍यांच्‍या विराट रूपासमोर सर्व जण फार छोटे दिसत होते. यजमानांचे शस्‍त्रकर्म करणार्‍या अस्‍थीरोग तज्ञांच्‍या ठिकाणी मला सद़्‍गुरु गाडगीळकाका दिसले; मात्र त्‍यांच्‍या हातात शस्‍त्रकर्मासाठी वापरली जाणारी कुठलीही उपकरणे नव्‍हती. त्‍याऐवजी ते प.पू. गुरुदेवांच्‍या चरणांवर वाहिलेले फूल शस्‍त्रकर्मासाठी उपकरण म्‍हणून वापरत होते. त्‍यामुळे कुठलीही चिरफाड न करता थोडेसेही रक्‍त न जाता यजमानांंवर उपचार होत होते.

९ आ. प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी पुष्‍पार्चना करून नमस्‍कार करतांना त्‍यांच्‍या डोळ्‍यांतील दोन प्रीतीमय अश्रू अंगावर पडून त्‍यांच्‍या कृपाशीर्वादात न्‍हाऊन निघणे : त्‍यानंतर मला दिसले, ‘आम्‍ही दोघे (मी आणि श्री. रविचंद्रन्) प.पू. गुरुदेवांच्‍या चरणांसमोर बसून त्‍यांच्‍या चरणी पुष्‍पार्चना करत आहोत. नंतर आम्‍ही त्‍यांच्‍या चरणांभोवती प्रदक्षिणा घालत आहोत.’ तेव्‍हा ‘आम्‍ही तिरुवण्‍णमलई पर्वतालाच प्रदक्षिणा घालत आहोत’, असे मला वाटत होते. आश्‍चर्याची गोष्‍ट, म्‍हणजे प्रदक्षिणा घालतांना यजमानांचे दोन्‍ही हात नमस्‍काराच्‍या मुद्रेत जोडले होते. प्रदक्षिणा घालून झाल्‍यावर आम्‍ही प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी साष्‍टांग नमस्‍कार घातला. त्‍या क्षणी प.पू. गुरुदेवांच्‍या डोळ्‍यांतून दोन प्रीतीमय अश्रू आमच्‍यावर पडले. त्‍या प्रीतीमय अश्रूंनी आम्‍ही त्‍यांच्‍या कृपाशीर्वादात न्‍हाऊन निघालो.

१०. ‘शस्‍त्रकर्म सुरळीत आणि यशस्‍वीरित्‍या पार पडले’, असे अस्‍थीरोग तज्ञांनी सांगणे

दुपारी १२ वाजता ‘यजमानांचे शस्‍त्रकर्म यशस्‍वी झाले असून अस्‍थीरोग तज्ञ मला भेटू इच्‍छितात’, असे मला सांगण्‍यात आले. अस्‍थीरोग तज्ञांनी मला सांगितले, ‘‘शस्‍त्रकर्म अत्‍यंत सुरळीत आणि यशस्‍वी झाले असून केवळ खांद्याचे तुटलेले हाड जोडण्‍याचे शस्‍त्रकर्म करावे लागले. खांदा पालटण्‍याची आवश्‍यकता भासली नाही. शस्‍त्रकर्म करतांना फारसा रक्‍तस्राव झाला नाही. त्‍यामुळे रक्‍त देण्‍याची आवश्‍यकता भासली नाही.’’

‘हे भगवंता, तू आमचे तीव्र प्रारब्‍ध नष्‍ट करून आम्‍हाला नवीन जीवन दिले आहेस. एकवेळ महासागराची खोली मोजता येऊ शकेल; परंतु तुझी साधकांवर असलेली अपार कृपा कधीच मोजता येणार नाही. हे प्रभो, आमच्‍याकडे तुला देण्‍यासारखे काहीच नसल्‍याने आम्‍ही आम्‍हालाच तुझ्‍या चरणकमलीअर्पण करतो.’                        (समाप्‍त)

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्‍नई (२२.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक