कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवणार ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

भाजपचे नेते ईश्‍वरप्पा यांचे आश्‍वासन !

भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – ध्वनीक्षेपकांमुळे विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वच चिंतेत आहेत. कर्नाटकात परीक्षा चालू असून ध्वनीक्षेपकावरील आवाजामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आमचे (भाजपचे) सरकार आले, तर सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक ताबडतोब काढून टाकले जातील, असे आश्‍वासन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिले. २ दिवसांपूर्वी एक सभेत ईश्‍वरप्पा यांनी ‘अल्लाला ऐकू येत नाही का ? त्याला नमाजासाठी बोलावण्यासाठी ध्वनीक्षेपक का लागतो?’ असे विधान केले होते.

१. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे, तर तुम्ही मशिदींवरील ध्वनीपेक्षकांवर बंदी का घालत नाही ? या प्रश्‍नावर ईश्‍वरप्पा म्हणाले की, मी केंद्र आणि राज्य सरकार यांना या ध्वनीक्षेपकांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती करणार आहे.

२. जिथे हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधल्या आहेत, तिथे आम्ही पुन्हा मंदिरे बांधू. मी एका लेखात वाचले होते की, ३६ सहस्र मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या. खरा आकडा मला ठाऊक नाही. मी अद्याप याविषयी काहीही केले नाही. पुढे काय करता येईल ते पाहू. मी केवळ माझ्या मनात काय होते ते सांगितले, असे ईश्‍वरप्पा यांनी या संदर्भातील एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हटले.

संपादकीय भूमिका

आता ज्या राज्यांत भाजप सत्तेत आहे, तेथे त्यांनी मशिदींवरील भोंगे काढावेत, असेच हिंदूंना वाटते !