इस्लामाबादमध्ये महिलांच्या फेरीवर पोलिसांचा लाठीमार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी काढलेल्या फेरीच्या वेळी हिंसाचार झाला. त्यावेळी फेरीतील महिला आणि पोलीस यांच्यातही झटापट झाली. येथील प्रेस क्लबच्या जवळ ही घटना घडली. ‘पोलिसांनी फेरी काढणार्‍यांवर लाठीमार करून फेरी रोखण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप करण्यात आला आहे.

१. या फेरीत तृतीयपंथीही सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, फेरीत सहभागी होण्यासाठी तृतीयपंथी प्रयत्न करत असतांना येथे गोंधळ निर्माण झाला, तर फेरीतील महिलांनी आरोप केला की, पोलिसांनी फेरी रोखण्याचा प्रयत्न केला.

२. या फेरीमध्ये मंत्री शेरी रहमान याही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ट्वीट करून झालेल्या गोंधळाविषयी म्हटले, ‘इस्लामाबादच्या पोलिसांकडून एक लहान आणि शांततापूर्ण फेरीवर केलेला लाठीमार निरर्थक होता. याचा मी निषेध करते. याची घटनेची चौकशी झाली पाहिजे.’ पाकिस्तान मानवाधिकार आयोगानेही लाठीमाराचा निषेध केला.