कोल्हापूर – अवघ्या मानवजातीच्या अस्तित्वात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पंचमहाभूतांवरील अतिरेकी आक्रमण हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी विविध विद्यापीठ-शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून पंचमहाभूत सजगता संदर्भाने पदवी-पदविका अभ्यासक्रम चालू व्हावेत, अशी अपेक्षा भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली. सिद्धगिरी मठ येथे सहाव्या दिवशी पृथ्वीतत्त्वावर झालेल्या परिसंवादात त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला, तसेच या सर्व परिसराची पहाणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.