इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील घटना
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीत काही सामाजिक कार्यकर्त्यांना नदी स्वच्छता करतांना एक पोते भरून आधारकार्ड, तसेच काही कागदपत्रे सापडली आहेत. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून सर्व आधारकार्ड, तसेच कागदपत्रे कह्यात घेतली. शिवाजीनगर पोलीस याचे अधिक अन्वेषण करत आहेत. दीड मासात सहस्रो शिधापत्रिका सापडल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात आधारकार्ड सापडल्याने यामागे मोठे ‘रॅकेट’ आहे का ? अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.
सापडलेल्या बहुतांश कार्डवरील नागरिकांचे वय हे ६० ते ६५ वर्षे आहे. प्राथमिक अन्वेषणात ही सर्व कार्ड इचलकरंजी परिसरातील आहेत, असे समजते.