‘सोमनाथ मंदिरामध्ये अयोग्य कृत्य चालू होते, त्यामुळे गझनीने आक्रमण केले !’-मौलाना साजिद रशिदी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य !

वेरावळ (गुजरात) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री सोमनाथ ट्रस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंह चावडा यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रशिदी यांनी काय म्हटले होते ?

रशिदी यांनी ९ जानेवारी या दिवशी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते की, इतिहासामध्ये असे आहे की, लोकांनी महंमद गझनी याला सांगितले होते की, सोमनाथ मंदिरामध्ये श्रद्धा आणि देवता यांच्या नावाखाली अयोग्य गोष्टी होत आहे. मुलींना गायब केले जात आहे. गझनी याने याची माहिती घेतली असता त्याला यात तथ्य आढळल्यावर त्याने आक्रमण केले. त्याने मंदिर तोडले नाही, तर तेथील अयोग्य कृत्य थांबवण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

अशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा झाली पाहिजे !