कोयना प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या समितीच्‍या अध्‍यक्षपदी मंत्री शंभूराज देसाई !

शंभूराज देसाई

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – कोयना प्रकल्‍पामुळे बाधित झालेल्‍यांच्‍या पुनर्वसनाविषयी काही प्रश्‍न प्रलंबित आहेत. याविषयी उच्‍चस्‍तरीय समन्‍वय समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या समितीच्‍या अध्‍यक्षपदी राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री तथा सातारा जिल्‍ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.