धर्मांध जोडप्‍याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !

हिंदु युवतीच्‍या नाकावर धर्मांधाच्‍या पत्नीने ठोसा दिल्‍याने रक्‍त आले !

मुंबई – भांडुप (पश्‍चिम) येथील प्रतापनगरमधील एका इमारतीत धर्मांध जोडप्‍याने शेजारील २४ वर्षीय युवती सिमरन यादव हिला ‘तिचा पाळीव कुत्रा विनाकारण भुंकतो आणि आमच्‍या मुलाला दुखापत करतो’, असे कारण दिले अन् घरात घुसून तिच्‍यावर हातोडी आणि लाकडी काठी यांनी आक्रमण केले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी आरोपी हनीफ खान आणि त्‍याची पत्नी नजमा यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून हनीफला अटक केली आहे. पोलीस ठाण्‍यात धर्मांध जोडप्‍याने आक्रमण केल्‍याचे नाकारले.

नजमा यांनी सिमरन यांच्‍या नाकावर ठोसा मारल्‍याने त्‍यांच्‍या नाकातून रक्‍त आले. आरोपी हनीफ याच्‍यावर याआधीही मारहाण केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. एका प्रकरणात खुनाचा आरोपही त्‍यांच्‍यावर आहे. (गुन्‍हे नोंद असणार्‍यांना समाजात मोकाट कसे काय फिरू दिले जाते ? नाकातून रक्‍त काढणार्‍या नजमाला अटक का केली नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • छोट्या छोट्या कारणांवरून हिंदूंना मारहाण करणार्‍या उद्दाम धर्मांधांना प्रशासनाने वेळीच आवर घालणे आवश्‍यक !
  • अल्‍पसंख्‍य धर्मांध हिंदूंच्‍या असंघटितपणाचा अपलाभ घेत त्‍यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि अरेरावी करतात, हेच या घटनेतून सिद्ध होते !
  • हिंदु तरुणींनो, अशा धर्मांधांचा प्रतिकार करण्‍यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण शिकून घ्‍या !