इंदूर येथील न्यायालयातील घटना !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती. ‘पठाण’ चित्रपटाचा विरोध करतांना कथित आक्षेपार्ह घोषणा देणार्या हिंदुत्वनिष्ठांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर या न्यायालयात सुनावणी चालू होती. त्या वेळी सोनू न्यायालयाबाहेर त्यांचे चित्रीकरण करत होती. सोनू हिच्यासह अधिवक्त्या नूरजहां हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोनू ही नूरजहां समवेत न्यायालयात आली होती. पोलीस आता तिचा शोध घेत आहेत. न्यायालयातील सुनावणीचा व्हिडिओ बनवून तो बंदी घातलेली जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) कार्यकर्त्यांना पाठवण्यात येणार होता.
सौजन्य सर्विस न्यूज
पोलिसांनी सोनू हिची झडती घेतल्यावर तिच्याकडे १ लाख १६ सहस्र रपयांची रोकड सापडली, तसेच तिच्या भ्रमणभाष संचामध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओही आढळले आहेत. तिने चौकशीत मान्य केले की, ती पी.एफ्.आय.साठी काम करते.
जिन्हें लगता है की PFI और उसका मिशन 2047 (गजवा ए हिंद)खत्म हो गया वो बहुत ही धोखे में हैं।
MP में प्रतिबंधित संगठन PFI के लिए जासूसी कर रही युवती गिरफ्तार, हिन्दू-मुस्लिम केस की जानकारी पहुंचाती रहीhttps://t.co/CW68ku07kM
राष्ट्रप्रेमी सनातनियों जागो और संगठित हो जाओ✊ pic.twitter.com/nCvMizxOR1
— प्रशासक समिति®✊🚩 (reg.ESWS) (@Prashask_Samiti) January 30, 2023
_____________________________________
संपादकीय भूमिकाजिहादी संघटनेशी काम करणार्या अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! |