स्वतः हिंदु असल्याचे भासवून हिंदु महिलेला ओढले प्रेमाच्या जाळ्यात

नवी देहली – येथे शोएब खान नावाच्या मुसलमान व्यक्तीने स्वतः हिंदु असल्याचे भासवून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, तसेच तिला २ मास बंदिस्त ठेवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित हिंदु महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे देहली पोलिसांनी आरोपी शोएब खान याला अटक केली.
हिंदू बन महिला के करीब आया शोएब खान, दावा- गोमांस खिलाया, दो महीने बंधक बनाकर रखा: दिल्ली का मामला#Delhi https://t.co/JsnTHvDHNd
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 11, 2023
पीडित हिंदु महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत; परंतु तिचे तिच्या पतीसमवेत वाद झाल्यामुळे ती वेगळी रहात होती. याच कालावधीत एक दिवस उपचारांसाठी ती रुग्णालयात गेली असता तिची शोएब खान याच्याशी भेट झाली. शोएब खान याने तो हिंदु असल्याचे सांगून तिला साहाय्य केले. पीडित महिला शोएबच्या बोलण्याला भुलली. आरोपीने एक दिवस पीडित महिलेला त्याच्या घरी नेले. तेथे त्याने तिला शीतपेय दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्धावस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर शोएबने पीडित हिंदु महिलेला फसवून गोमांस खाऊ घातले, तसेच तिला दोन मास खोलीत बंदिस्त ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाआणखी किती प्रकरणे घडल्यावर देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होणार आहे ? |
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत