जर्मनीत रायासनिक आक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सुरक्षादलांनी उधळला !

२ जिहाद्यांना अटक


बर्लिन (जर्मनी) – जर्मन पोलिसांनी देशातील नॉर्थ र्‍हाइन-वेस्टफेलिया येथून इराणच्या २ जिहादी नागरिकांना अटक केली. ते येथे अस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या प्रयत्नात होते. हे दोघेही इस्लामी कट्टरतावादाने प्रेरित होते. जर्मनीमध्ये त्यांना ‘एम्जे’ आणि ‘जेजे’ म्हटले जाते. या दोघांच्या घरातून सायनाईड, रिसिन यांसारखी अनेक विषारी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. रिसिन हे एरंडीच्या बियांपासून बनवले जाते. रिसिनने एखाद्या व्यक्तीच्या शरिरात प्रवेश केला, तर काही मिनिटांत त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे सायनाइडपेक्षा ६ सहस्र पट अधिक घातक आहे. जर्मनीमध्ये अशा प्रकारच्या आक्रमणाच्या आरोपांसाठी ३ ते १५ वर्षांची शिक्षा आहे.

१. जर्मनीच्या सुरक्षादलांना अमेरिकेच्या एफ्.बी.आय. या अन्वेषण यंत्रणेकडून संभाव्य जैविक आक्रमणाची माहिती मिळाली होती. याची माहिती मिळताच जर्मनीचे सुरक्षादल आरोपींच्या घरी पोचले. या वेळी आजूबाजूचा परिसर बंद करण्यात आला होता. या दोघांना पकडण्यापूर्वी सुरक्षादलांनी जैविक आणि रासायनिक आक्रमणांचा प्रभाव टाळण्यासाठी संरक्षणात्मक पोशाख घातले होते.

२. जर्मनीमध्ये वर्ष २०१८ मध्ये रसायनांद्वारे आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली ट्युनिशियातील एका जोडप्याला अटक करण्यात आली होती. ते दोघे इस्लामिक स्टेटचे समर्थक होते. त्यांच्याकडून ८४ मिलीग्राम रिसिन जप्त करण्यात आले होते. विषारी बाँब बनवण्यासाठी दोघांनी इंटरनेटवरून अनेक प्रकारची घातक रसायने मागवली होती. या दांपत्यापैकी पतीला १० वर्षांची, तर पत्नीला ८ वर्षांची शिक्षा झाली आहे.

संपादकीय भूमिका

जर्मनीसारख्या प्रगत देशातही जिहादी कारवाया वाढत आहेत, याचे हे उदाहरण ! मानवतावादाच्या नावाखाली धर्मांधांना आश्रय दिल्याचा हा परिणाम त्याला भोगावा लागत आहे !