अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करणार्‍या २ मुसलमान भावांना अटक

वारंगल (तेलंगाणा) – येथील एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अजमत अली आणि अबू अली नावाच्या २ मुसलमान भावांना अटक करण्यात आली. दोन्ही भाऊ सुमारे ६ मासांपासून मुलीवर बलात्कार करत होते.

१. पीडित मुलगी ही या मुसलमानांच्या शेजारी रहाते. ६ मासांपूर्वी यांतील एका भावाने पीडित मुलीवर बळजोरी तिला स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला धमकावून लैंगिक अत्याचार चालू ठेवले.

२. त्यानंतर त्याचा भाऊही तिच्यावर बलात्कार करू लागला. पीडितेने ४ जानेवारी २०२३ या दिवशी कुटुंबियांना याविषयी सांगितले. कुटुंबियांनी दोन्ही मुसलमानांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

३. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप आणि हिंदु संघटना यांनी निदर्शने केली. अजमत अली आणि अबू यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’, अशी घोषणा देणारे अशा घटनांच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?