नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेच्या सभागृहातून येत्या ७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी निवृत्त होणारे सदस्य विक्रम काळे (संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ), डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ), नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ) या ५ विधान परिषद सदस्यांना ३० डिसेंबर या दिवशी सभागृहात निरोप देण्यात आला. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणार्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी निवृत्त होणार्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > विधान परिषदेच्या निवृत्त होणार्या सदस्यांना निरोप !
विधान परिषदेच्या निवृत्त होणार्या सदस्यांना निरोप !
नूतन लेख
वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय मंडळींची लगबग अधिक !
श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब कुजले !
इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दीड लाखांहून अधिक विद्यार्थी
नगरपालिका इमारतीसाठी उत्खनन केलेल्या गौण खनिजाची परस्पर विक्री !
नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !
सोलापूर विद्यापिठाच्या उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्क्रीन’ पडताळणी होणार !